मंगल कार्यालयाचे भरून न येणारे नुकसान ( अनेकांचा रोजगार बुडाला. परिस्थितीवर मर्यादा विशेष पॅकेजची गरज )

राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)

सलग दोन वर्ष लग्नसराईत लग्न कार्यावर निर्बंधामुळे राळेगांव शहरातील मंगल कार्यालय चालकांना मोठा फटका बसला आहे. एप्रिल व मे महिन्यात लग्न कार्याचे बुकिंगही रद्द झाल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे या कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय व व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांचा रोजगार बंद झाला आहे या व्यवसायासाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पॅकेज दिली तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरू शकतो असे मत त्रिमूर्ती मंगल कार्यालयाचे चालक प्रदीपभाऊ ठुणे यांनी व्यक्त केले आहे.
लॉकडाऊन काळात शासनाने मंगल कार्यालयावर संपूर्णता बंदी घातली यामुळे मागील दीड वर्षात सर्वच मंगल कार्यालय मालक आर्थिक संकटात सापडले आहे मंगल कार्यालय संचालकांनी बँके कडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन कार्यालयाची उभारणी केली आहे मात्र लॉकडाऊन काळात उत्पन्न नसतानाही बँकेचे व्याज मात्र चालू होते मात्र मंगल कार्यालयात विवाह समारंभ बंद असल्याने बँकेचं कर्जाचे हप्ते भरायचे कसे असा गंभीर प्रश्न उदभवला त्याच प्रमाणे विद्युत बिल तसेच कार्यालयात असलेल्या कामगारांना महिन्याचे वेतन आदी द्यावे लागत असल्याने मंगल कार्यालय चालकांची मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे.
राळेगाव तालुका आदिवासी बहुल भाग असून राळेगाव शहरात केवळ तीन मंगल कार्यालयात आहे. लग्नाच्या सीजन सुरु झाल्यानंतर तालुक्यातील नागरिक कमी किमतीत मंगल कार्यालय मिळत असल्याने शहरात असलेल्या मंगल कार्यालयात लग्न सोहळे करतात त्यामुळे एका मंगल कार्यालयात कमीत कमी १५० लग्न पार पडत असून एका लग्नकार्यालयाचे भाडे ३० ते ३५ हजार रुपये मिळत असून या वर्षभऱ्याच्या कालावधीत ४० ते ४५ लाख रुपयाचे मंगल कार्यालयाचे नुकसान झाले आहे त्यामुळे या दोन वर्षांच्या कोरोनाच्या काळात एक कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या हॉलमध्ये १०० व मैदानात २०० लोकांना परवानगी देण्यात आली परंतु काही कार्यालय मोठे असतात व यात फक्त शंभर लोक म्हटले की लोक कार्यालयात लग्न करणे टाळतात यामुळे या कार्यालय मालकासोबत बँड डेकोरेटर्स साऊंड सिस्टिम केटरिंग डीजे साउंड लाईट डेकोरेशन व्यवस्थापक आधी सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचा उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असून मंगल कार्यालयाचे झालेले नुकसान भरून निघणारे नसल्याने शासनाने मंगल कार्यालयांना विशेष पॅकेज देण्यात यावे असे मत मंगल कार्यालय चालकांनी व्यक्त केले आहे.

  प्रतिक्रिया

लॉकडाऊन मुळे मंगल कार्यालयाचा व्यवसाय १००% बंद झाला आहे त्यामुळे मंगल कार्यालयात कामकाज करणाऱ्या भांडी धुणाऱ्या गोर गरीब महिलांचा रोजगार बंद झाला आहे मंगल कार्यालय वर आलेली ही आर्थिक माहामारी असून मंगल कार्यालयचालकाना नगरपंचायतने घरपट्टी व पाणीबिलात सवलत द्यावी तसेच वीज बिलात सवलत द्यावी त्याचबरोबर बँकेचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तरच मंगल कार्यालय चालक तग धरू शकतील
प्रदीपभाऊ ठुणे
त्रिमूर्ती मंगल कार्यालय
राळेगांव
………

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी जे उपाय लॉकडाऊन काळात शासनाने सुचवले त्यात मंगल कार्यालयावर संपूर्णता बंदी घालण्यात आली यामुळे मागील दोन वर्ष संपूर्ण लग्नसराईत एकही लग्न न करता मंगल कार्यालय मालकांना काढावी लागली बँकेचे व्याज वाढत आहे शासनाने मंगल कार्यालयाच्या ५० टक्के संमतीने लग्न करण्यास परवानगी द्यावी तरच हा व्यवसाय थोडाफार पूर्ण पदावर येईल
संजयभाऊ पोपट
हरे कृष्ण मंगलम राळेगांव

………..


गेल्या दीड वर्षापासून लग्न व विविध कार्यालयावर बंदी आहे त्यामुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला आहे इतर कोणताही व्यवसाय नसल्याने आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे लग्नाच्या तारखा नोव्हेंबर-डिसेंबर एप्रिल-मे महिन्यात असतात या कमाईवर वर्षभर घरखर्च भागवायला जाते त्यामुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला आहे
संजयभाऊ दुरबुडे
अर्पण फोटो स्टुडिओ & फोटोग्राफी राळेगांव
…….