राळेगाव तालुक्यातील धागा उत्पादकांचा खादी कापड निर्मितीचा शुभारंभ

सहसंपादक -रामभाऊ भोयर

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राळेगाव तालुक्यातील धागा उत्पादकांनी तयार केलेल्या धाग्यापासून खादी कापड निर्मितीच्या उद्योगाचे उद्घाटन , ‘ रुरल मॉल ‘ रेल्वेस्टेशन समोर वर्धा येथे करण्यात आले.
तालुक्यातील सावंगी ( पे. ) , आटमुर्डी , वरध , चिखली व राळेगाव येथील युवक युवतींनी स्वत:चे घरीच ‘ सोलर चरखा ‘ द्वारे धागा उत्पादन करुन स्वरोजगार साध्य केला .या उत्पादीत धाग्यापासून खादी कापड निर्मितीचा उद्योग वर्धा येथे सुरू केल्यामुळे सर्व धागा उत्पादकांचे मनोबल वाढले असून जास्तीत जास्त धागा उत्पादन करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला . राळेगाव येथे सुद्धा येथील उत्पादीत धाग्यापासून खादी कापड निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून श्री महेश सिंघ सर सीनियर सायंटिस्ट भारत सरकार MGIRI वर्धा व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री ज्ञानेश्वरराव ढगे हे लाभले होते.
तसेच श्री बळवंतजी ढगे , डॉ. सुधिर धोटे , निलेशजी मोहदुरे , किशोर डंभारे , आनंदराव गलांडे , वैशालीताई झलके ,
सिमाताई सुरकार , सिमाताई दिवे , अलकाताई बोंदाडे व कल्पनाताई झलके हे कार्यक्रमात उपस्थित होते .
या खादी कापड निर्मिती उद्योगाचे उभारणीसाठी राळेगाव येथील प्रकाश झलके , गजाननराव सुरकर व दिपक दिवे यांनी परीश्रम घेतले .