
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत महायुतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. राजश्री पाटील या हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ जिल्ह्याशी त्यांचे जुने नाते असल्याचे या मतदारसंघात बोलले जात असले तरी मात्र त्यांना निवडणुकीत फारसे कोणी जवळ करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारार्थ आजपावेतो झालेल्या सभा, रोड शो यांनाही अत्यल्प प्रतिसाद मिळत असून मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या सभोवताली असलेल्या गोतावळ्याने मात्र त्यांना ही वस्तुस्थिती व मतदारांमध्ये असलेल्या चची न सांगता आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ अश्या फुग्यात त्यांना बसवून ठेवले असल्याचे खुद्द महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते चर्चा करीत आहे. परिणामी सामान्य कार्यकर्ते हे त्यांच्या प्रचारापासून अलिप्त राहण्यात आपले समाधान मानत असल्याचे बोलले जात आहे. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीचे नेते अभिनेते, मुख्यमंत्री ना. शिंदे खुद्द वाशिम जिल्ह्यात आले असले तरी मात्र त्यांच्या नावावर मतदारसंघात कमालीची नाराजी पसरली आहे. त्यातच महायुतिच्या विविध सभा, प्रचार रॅली यामध्ये घटक पक्षाच्या नेत्यांना मिळणारी सावत्र वागणूक यामुळे घटक पक्षातल नेत्यांनी सुद्धा राजश्री पाटील यांच्या नावावर चक्क ‘फुली’ मारली असल्याची माहिती विश्वासवनिय सूत्रांकडून प्राप्त आहे.
एकंदरीत नियोजनशून्य कारभारामुळे राजश्री पाटील यांना वाशिम – यवतमाळ लोकसभा मतदारसंघात मतदारांचा ‘नो रिस्पॉन्स’ असल्याचे दिसून येत आहे.
परिणामी या मतदारसंघात सेनेला उतरती कळा लागली असून आपला बालेकिल्ला गमवावा लागणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या पाच टर्मपासून या मतदारसंघात खा. भावना गवळी यांचे निर्विवाद वर्चस्व होते. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांचा पत्ता कट करीत महायुतीने पार्सल उमेदवार म्हणून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने या निवडणुकीत शिवसेनेला आपला बालेकीला गमवावा लागणार असल्याचे भाकीत राजकीय तज्ञ यांनी व्यक्त केले आहे. तर पार्सल उमेदवार असल्याने राजश्री पाटील यांना या मतदारसंघातील वाशिम जिल्हयात मतदारांचा ‘नो रिस्पॉन्स’ असल्याचे दिसून येत आहे.
मूठभर व्यापारी व ठेकेदारांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा ?
राजश्री पाटील यांच्या प्रचारात नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यल्प प्रमाणात दिसून येतात तर मात्र मर्जीतील ठेकेदार, व्यापारी हे अधिक प्रमाणात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची धुरा ही या मूठभर व्यापारी व ठेकेदार सांभाळत आहे की काय ? अशी उपरोधात्मक चर्चा या मतदारसंघात जोर धरत असून राजश्री पाटील यांचे देऊळ पाण्यात असल्याची चर्चा आहे.
