माजरी येथील भुलक्ष्मी मातेच्या मंदिराला पांच वर्षे पूर्तीच्या निमित्ताने तेलगू बांधवांकडून सामूहिक पूजा उत्सव साजरा

भद्रावती तालुक्यातील माजरी गावातील प्रभाग क्रमांक 5 मधील भुलक्ष्मी माता मंदिराला दि : 17/01/2025 ला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण तेलुगू समुदायाने भुलक्ष्मी माता जीची पूजा मोठ्या उत्साहात आयोजित केली सर्वांनी यात सहभाग घेतला. उपस्थित असलेल्या सर्व तेलुगू लोकांनी त्यांच्या कुटुंबासह तेलुगू परंपरेनुसार भुलक्ष्मी देवीची पूजा केली.
या पूजेमध्ये, महिला भोनम ला हळद, कुंकू, कडूनिंबाची पाने आणि पांढरी रांगोळी काढत सजवतात. आणि त्यावर दिवा लावतात आणि नंतर भुलक्ष्मी आणि पोचम्मा आणि मैसम्मा .मंदिराला जात आहे .तेलुगू लोकांमध्ये भुलक्ष्मी मातेसाठी खूप श्रद्धा असल्याने तेलगू लोकांसाठी हा उत्सव एकत्र येण्याचा आणि सामुहिकरीत्या पूजा उत्सव साजरा करण्याचा असतों .