
पोलीसांच्या कार्य तत्परतेने वाचला मुलीचा जीव
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे दि २५ एप्रिल रोजी गुप्तधनाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी असलेल्या आरोपी वडील, मांत्रिकासह नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्यामुळे मुलीचा जीव वाचला करिता भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने दि.७ मा रोजी बाभुळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र जेधे यांचे सह कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.यामुळे आपले कर्तव्य पार पाडत असतांना पोलीस प्रशासनाचे मनोबल वाढेल व अधिक जोमाने अशा संवेदनशील प्रकरणाला वाचा फोडता येईल.
मुलीच्या वडिलानेही गुप्तधनाच्या हव्यासाने नरबळी देण्याची तयारी सुरु असल्याने मुलीने तात्काळ आपल्या मोबाईलमधून वडील आणि मांत्रिकात सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ शूट केला तसेच खोदलेला खड्डा आणि मांडलेल्या पूजेचे फोटो काढले आणि हा व्हिडिओ आणि फोटो तिने या प्रकाराची माहिती तातडीने बाभूळगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मादणी येथे धाव घेऊन मांत्रिक आणि प्रमुख आराेपी मुलीच्या वडिलाचे मनसुबे उधळून लावले.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, जमादार दिगंबर अलामे,सागर बेलसरे,गणेश शिंदे,आदींनी पार पाडली.उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी केली.या केलेल्या कारवाईमुळे मुलीचा जीव वाचला व आरोपींना अटक करण्यात आली.भारतीय नारी रक्षा संघटनेच्या वतिने सत्कार करतांना,संतोषी वर्मा,ललीता वर्मा,सीमा बाळबुद्धे,वनमाला पांडे,नेहा बहाळे,मंगला चन्ने,सुकांत वंजारी,मकसुद अली,राज वर्मा,मोहसिन सय्यद आदी उपस्थित होते.
