
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी पोंभूर्णा येथील बस्थानक चौक येथे व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुलभा पिपरे, गटनेता आशिष कावटवार, नगरसेवक बालाजी मेश्राम,अतुल वाकडे,अभिषेक बद्दलवार,नगरसेविका आकाशी गेडाम,रोहनी ढोले, उषा गोरंतवार, शारदा गुरूनुले,आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मलार्पण करून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली.
स्वच्छता ही सेवा २०२३ “कचरामुक्त भारत” कारायच आहे. यामध्ये बसस्थानक सार्वजनिक ठिकाणी आय टी आय कडून मोहीम राबविण्यात आली.याबाबत सविस्तर माहिती निर्देशक काळे यांनी सर्व विद्यार्थी, कर्मचारी, पदाधिकारी यांना देण्यात आली. शहरात एक ऑक्टोबर रोजीची महाश्रमदान मोहीम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थीनी एक दिवसातील एक तास आपल्या शहराचा स्वच्छतेसाठी द्यावा असे आवाहन देऊन स्वछता मोहिमला सुरुवात करण्यात आली यावेळी गटनिर्देशक मानकर,शिक्षक निमगडे, रवींद्र काळे, आकाश आरावार, गोपाल कंठावार, नानदीप कंनाके, पूजा कुबले, विद्या पेंदोर व आदी कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
