रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर वडकी पोलिसांनी केली कारवाई

सहसंपादक: रामभाऊ भोयर

वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा नदीपात्रातून रेतीची विना रॉयल्टी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला वडकी पोलिसांनी पकडले.या कारवाईत ट्रॅक्टरसह सुमारे ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिसांनी वडकी येथील दावत बारसमोर दि २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० दरम्यान केली.
वर्धा जिल्ह्यातील धोच्ची येथील ट्रॅक्टर चालक विकास जगराम सलाटे वय ३० वर्षे हा वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा नदीपात्रातून रेतीची अवैधरीत्या वाहतूक करून त्याची विक्री करणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली.या माहितीवरून वडकी पोलिसांनी सापळा रचून रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला.व ट्रॅक्टर चालकाविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची ही कारवाई ठाणेदार सुखदेव भोरखडे यांचे मार्गदर्शनात पीएस आय प्रशांत जाधव बिट जमादार संदीप मडावी चालक विनोद नागरगोजे यांनी पार पडली.