
राळेगाव खरेदी विक्री संघाची होऊ घातलेली आमसभा दिनांक 17/9/2022 रोज शनिवारला दुपारी दोन वाजता खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.या आमसभेत संस्थेच्या वार्षिक उत्पन्न व सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल सोबतच संस्था तीन लाख पासष्ट हजार रुपये नफ्यात असून नाफेडकडे कमीशन पोटी सतरा लाख पंच्यान्नव हजार नवशे साठ तर जिन मार्केटिंग कडे अट्ठ्यांशी हजार आठशे त्रेसष्ठ रूपये येणे बाकी असल्याची सभासदांना माहिती देण्यात आली.सोबतच भविष्यात सुध्द्धा ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत राहो.अशा शुभेच्छा दिल्या.त्यावेळी या आमसभेला संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष मनिष गांधी, सोबतच जिनिंगचे अध्यक्ष नंदकुमार गांधी, उपाध्यक्ष अंकुशराव रोहोणकर, त्याचप्रमाणे माजी मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके, चित्तरंजन कोल्हे, अरविंद वाढोणकर, विलासराव भोयर, राजेंद्र तेलंगे, जानराव गिरी, बाबाराव निमरड, अंकुश मुनेश्वर, डॉ.केंढे, अशोकराव राऊत, कृष्णराव राहूळकर, गोवर्धन वाघमारे, अशोकराव काचोळे, किशोर धामंदे,श्रावनसिंग वडते, सचिन हुरकुंडे,भरत पाल,अनिल केवटे, अंकित कटारिया,कांतूसेठ बोथरा, प्रदीप ठुणे,मनोज मानकर, राजेश काळे, प्रफुल्ल तायवाडे, अनिल देशमुख,प्रविण झोटींग,सुधाकर गेडेकार, सचिन टोंग, राजेंद्र ओंकार,राजू महाजन, सुरेश पेंद्राम,मोहन नरडवार, प्रतिक बोबडे, तातेश्वर पिसे सर, गजानन पाल, शंकर गायधने,राहूल होले, प्रतिक बोबडे सुनिल भामकर, शशिकांत धुमाळ, विनोद नरड, प्रदीप डाखोरे, विठ्ठलराव चहादंकर, गणेश नेहारे, जयवंत झाडे, रामभाऊ कुडमथे, अर्चनाताई धर्मे, तथा या व्यतिरिक्त तालुक्यातील अनेक सभासद, बाजार समितीचे पदाधिकारी, वसंत जिनिंगचे पदाधिकारी, खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे तालुक्यातील पदाधिकारी,नगर पंचायतीचे पदाधिकारी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संचलन संस्थेचे सचिव संजय जुमडे यांनी केले.संस्थेची सविस्तर माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले यांनी दिली व आभार मानून आमसभा संपन्न झाल्याचे जाहीर केले.
