
पुणे : 21 मे 2025 : पुण्यात
युवा क्रांती फौंडेशनचा तिसरा वर्धापनदिन थाटात साजरा झाला. चि. नयन नाईक आणि कु.अजया मुळीक या बालकांच्या शुभहस्ते केक कापून वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रारंभी वसुधा नाईक यांनी प्रास्ताविकात युवा क्रांती फौंडेशनची कार्यपध्दती,
ध्येय धोरणं याविषयी विस्तृत माहिती दिली. वर्धापनदिनाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी
डहाळी अनितकालिकाच्या 763 व्या विशेषांकाचे
प्रकाशन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याचप्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना त्यांच्या महाराष्ट्र
प्रदेश सल्लागार पदाचे ID वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते
प्रदान करण्यात आले तसेच भारती महाडिक यांना महाराष्ट्र प्रदेश मार्गदर्शक पदाचे ID प्रदान करण्यात आले. प्रिया प्रमोद दामले, मधुकर्णिका सारिका सासवडे , गौरव पुंडे यांचीही भाषणे झाली. दीपाराणी गोसावी यांनी युवा क्रांती फौंडेशनच्या यशस्वी वाटचालीवर एक पोलीस गीत सादर केले.
सुरक्षा अधिकारी सोमनाथ चौधरी यांचा वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.प्रदेश सल्लागार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सदर सोहळ्याचा समारोप केला. या कार्यक्रमासाठी उपस्थित वैभव नाईक, कोमल, शीतल नाईक, रवी डिंबळे, रसिका,गावडे सर इत्यादीनी आपले मनोगत सादर केले.
पहलगाम येथील हुतात्म्यांना तसेच ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व.डाॅ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली .” कार्यकर्त्यांनी युवा क्रांती फौंडेशनचे कार्य तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी सामाजिक समरतेवर अधिक भर द्यावाअसे प्रतिपादन डाॅ.घाणेकर यांनी केले.
वसुधा वैभव नाईक, पुणे
युवा क्रांती पोलीस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष.