
]
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिप व रब्बी हंगामाप्रमाणे उन्हाळी हंगाम २०२४-२०२५ मध्ये पिकाची ई -पीक नोंदणी करण्याचे आवाहन तहसीलदार अमित भोईटे यांनी केले आहे.मोबाईल अप डिजिटल क्रोप सर्व्हे डीसी एस द्वारे दिनांक ०१ एप्रिल २०२५ पासून संपूर्ण राज्यात DCS MOBILE APP-version-3 वर सुरु करण्यात आले. त्यानुसार दिनांक -०१ एप्रिल २०२५ ते १५ मे २०२५ पावेतो शेतक-यांनी ई पिक पाहणी करायची आहे.
गावात असणा-या संपूर्ण गटाची (शासकीय गट सोडून) उन्हाळी पिक असो अथवा नसो ई- पिक पाहणी करायची आहे. उन्हाळी पिक नसणा-या गटामध्ये चालू पड म्हणून नोंद करायची आहे. ई- पिक पाहणी करतांना बांधापासून शेतामध्ये २० मी. आत राहणे आवश्यक आहे. तलाठ्यांनी शेतकरी व सहाय्यक स्तरावरील १०० टक्के पिक पाहणीला मान्याता दयावी, फक्त हंगाम सुरु असतांना ई-पिक दुरुस्ती करिता मंडळ अधिकारी यांना व्हेरीफायर लॉग ईन सुरु करण्यात आलेले आहे. तसेच ई- पिक पाहणी करतांना पिकांचे दोन फोटो घेण्यात येऊन साठवावे. ई- पिक पाहणी करतांना उपरोक्त बाबींचे अवलोकन करून गाव स्तरावर मंडळ स्तरावर प्रबोधन करून ई पिक १०० टक्के पुर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
