तूम्ही येथे राजकारण करत आहे का?…
आमदार बांधावर ?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आमदारां चा सवाल?

“तूम्ही येथे राजकारण करत आहे का? असा सवाल विद्यमान आमदारांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केल्या ची जोरदार चविष्ट चर्चा सध्या राळेगांव शहरात सुरु आहे.
३० जूलै रोजी ७७ राळेगांव विधानसभा मतदारसंघा चे विद्यमान भाजपा आमदार, सर्व प्रशासकीय यंत्रणा, आपल्या चेल्याचपाट्या सह, अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानी चा अदमास घ्यावयास वाऱ्हा, आष्टा शिवारात आले असताना असं व्यक्तव्य आमदारांनी काही काॅग्रेस कार्यकर्ते यांना उद्देशून केल्याचं कळतंय. दोन नाल्यांच्या पूरा मुळे या शेतशिवारात सर्वत्र पाणी चं पाणी, वाऱ्हा गावात ये जा बंद अशी परिस्थिती निर्माण होते.
नाला खोलीकरण व सरळीकरणा साठी प्रशासना कडे या शिवारातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे पण यांत हयगय झाल्या ने सतत तीन वर्षे संपूर्ण शेतशिवारात तलाव सदृष्य स्थिती निर्माण होऊन पिकं खरवडून गेली आहे.या शिवारात बहूतांश काॅग्रेस व इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या शेतजमिनी आहे.
“या आधी नाल्या ला पूर आला नाही का? आपल्या नेत्यांनी काय केलं? तूम्ही राजकारण करत आहे का?
असे प्रश्न विचारले असता काही शेतकऱ्यांनी त्यांनी केलं नाही म्हणून तर तूम्हांला निवडून दिलं, असे उत्तर दिले.
आमदारांनी बांधावर तर पाय ठेवलाच नाही,भर रस्त्यावर आमदार व शेतकऱ्यां मध्ये हा कलगीतुरा रंगला होता.
संपूर्ण पिकं खरवडून गेली तरीही नुकसान भरपाई तीस टक्के या प्रमाणात शेतकऱ्यां ना द्या वी असे आमदारां नी उपस्थित पंचवीस ते तीस शेतकरी बांधवां समोर शासकीय अधिकारी यांना सर्व शेतकऱ्यां समक्ष सांगितल्यावर रोष वाढला आहे.