
सहसंपादक-रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल येथे राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तीव्र उन्हात झाडे वाचवण्यासाठी टाकाऊ पाण्याच्या प्लास्टिक बॉटल ठिबक सिंचन मोहिम राबविण्यात आली असून शाळेतील झाडांना जीवनदान देण्यात आले आहे. एका प्लास्टिक बॉटल ला सुतळी लावून त्यात दररोज पाणी भरून तीव्र उन्हात झाडांना जीवनदान प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षक अमोल ढुमणे,सहकारी शिक्षक व विद्यार्थी चमू दररोज शाळेत हा ठिबक सिंचन मोहीम राबवित आहे. या उपक्रमाची दखल राळेगाव शहरातील अनेक वृक्ष प्रेमी मंडळींनी शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन घेत असून आता शाळेतील वृक्ष वाचवण्यासाठी प्लास्टिक बॉटल ठिबक सिंचन मोहीम राळेगाव शहरांत अनेक वृक्ष प्रेमी राबवित आहे. त्यामुळे परिसरातील वृक्ष प्रेमी मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
