राळेगाव युवासेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे तर राळेगाव विधानसभा संघटक पदी अमोल राऊत यांची नियुक्ती

सहसंपादक -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील युवासेना तालुका प्रमुख पदी येवती येथील युवा व तडफदार शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते वृषभ दरोडे यांची नियुक्ती करण्यात आली तर राळेगाव विधानसभा युवा सघंटक पदी करंजी येथील अमोल राऊत यांची नियुती करण्यात आली,
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून युवासेना सचिव वरून सरदेसाई विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद सावंत तसेच विभागीय सचिव सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार यवतमाळ जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड ,यवतमाळ जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, व युवासेना यवतमाळ जिल्हा प्रमुख अमोल धोपेकर व शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे यांच्या शिपारशीमुळे यवतमाळ येथे दि.9/4/2023 ला विश्राम गृहात नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आलीआहे राळेगाव विधानसभा संघटक अमोल राऊत तर राळेगाव युवासेना तालुका प्रमुख वृषभ दरोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.