यवतमाळ विभागातील यंत्रचालक प्रदीप थुल गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित

सहसंपादक: रामभाऊ भोयर

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अमरावती येथे महावितरणच्या अमरावती परिमंडळ कार्यालयात महावितरण साठी उत्कृष्ट ग्राहक सेवा देणाऱ्या ८ यंत्रचालक व ४१ तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून या गुणवंत पुरस्कारात यवतमाळ विभागातून यंत्रचालक म्हणून प्रदीप चंदूजी थुल यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रदीप थुल हे राळेगाव तालुक्यातील झाडगांव येथे विद्युत वितरण ३३ केवी उपकेंद्र येथे यंत्राचालक पदावर कार्यरत आहेत थुल यानी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे झालेल्या गुणवंत कामगार सोहळ्यात ग्राहकाभिमुख सेवा देत वीज ग्राहकांच्या मनामध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात योगदान देणाऱ्या कामगाराचा गुणवंत कामगार वितरण सोहळा मुख्य अभियंता ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला असून या गुणवंत कामगार सोहळ्याला उपस्थित अधीक्षक अभियंता सुनील शिंदे’ दीपक देवहाते, तर कार्यकारी अभियंता भारतभूषण औघड, आनंद काटकर, अनिरुद्ध आलेगावकर, राजेश माहुलकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने, तसेच इतर अधिकारी कर्मचारी आदी मान्यवर या गुणवंत कामगार सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.