सोनामाता हायस्कूल चहांद येथे महावाचन दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

डॉक्टर य.मो. दोन्दे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्ट च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत सोनामाता हायस्कूल चहांद येथे महावाचन हा उपक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला. सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, विद्यार्थी वाचनाने समृद्ध व्हावा, वाचनातून व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक ती प्रेरणा लाभावी, हा विचार मनी बाळगून महावाचन हा उपक्रम सोनामाताा हायस्कूल चहान्दच्या प्रांगणात घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे वाचन सामूहिकरीत्या शाळेच्या पटांगणामध्ये करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वाचनाद्वारे माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियाना अंतर्गत शाळेमध्ये घेत असलेले उपक्रम व त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग याबद्दलचे महत्त्व समजावून घेतले. हा कार्यक्रम माननीय मुख्याध्यापक श्री.धोबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय चिव्हाणे सर, कांबळे सर, गोवारदिपे मॅडम, शिवणकर सर, दांडेकर सर, सोनवणे सर, राऊत सर, या सर्वांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना वाचनातून प्रेरणा मिळावी व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये वाचनाने भर पडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम घेण्यात आला.