मुस्लिम समाज भवनाचे लोकार्पण आधीच असामाजिक तत्वांकडून नुकसान,लवकरात लवकर लोकार्पण करा : एम आय एम तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांची मागणी

वरोरा शहरातील कॉलरी वॉर्ड येथे मुस्लिम समाजासाठी राखीव असलेल्या जागेत आमदार निधीतून तयार झालेले मुस्लिम समाज भवन कित्येक दिवसापासून तयार झाले आहे.परंतु अजुनही त्याचे लोकार्पण झालेले नाही. समजतील विविध कार्यक्रम , मुस्लिम समाजातील अनेक कुटुंबातील शुभ कार्याप्रसंगी समाज भवन हाच एकमेव पर्याय पुढे येऊ शकतो .समाजभवनाचमुळे माध्यमातून विविध विधायक कार्यक्रम हाती घेत समाजला एकत्र आणणे शक्य होणार असल्याने लवकरात लवकर या समाजभवनाचा लोकार्पण सोहळा घेत समाजभवन सर्वसामान्य नागरीकांना उपलब्ध करून द्या अशी मागणी एम आय एम चे तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मुस्लिम समाजातील सर्व तळागाळातील नागरिकांना विश्वासात घेत त्यांच्या साठी तयार केलेल्या समाजभवनाचा लोकार्पण सोहळा लवकर संपन्न झाल्यास आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या समाजातील नागरिकांना त्याचे शुभ कार्य अतिशय सोयीस्कर रित्या पार पाडता येईल असे एम आय एम तालुकाध्यक्ष मुज्जमिल शेख यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.