
ढाणकी प्रती -प्रवीण जोशी
स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय येथे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विद्यालयात स्वयंशासन दिनाचे, आयोजन केले होते, यात अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आर. एच. जयस्वाल सर व पर्यवेक्षक श्री. पी. आर. जाधव सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आदर व्यक्त करणारी भाषणे, कविता, चारोळ्या म्हटल्या . तसेच पराते, चव्हान, पतंगराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे केली. तसेच मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्याने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. श्री पतंगराव यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला वृक्ष कुंडी भेट देण्याचा उपक्रम सुरू केला. अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रोशनी भोयर हिने केले. व आभार प्रदर्शन श्री. खाडे सर यांनी केले.
