शिक्षणाचे जिने उघडले दार,तीच समाजाची शिल्पकार: प्राध्यापिका कुंदा काळे


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय् व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 3/1/2023 रोज मंगळवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन वर्ग 10 वा अ कडून करण्यात आले होते.या कार्यक्रमात सर्वप्रथम व्यासपिठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड व प्रमुख पाहुणे कुंदा काळे व वर्गशिक्षक दिगांबर बातुलवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.त्यानंतर पाहुण्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्गशिक्षक दिगांबर बातुलवार यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. त्यानंतर विद्यार्थी वक्ते सुजल रामगडे,वेदिका चौधरी, रोहिणी मेश्राम, समिक्षा लोहोट,वैभव नेहारे, तेजस्विनी नेहारे,नेहा झुंझुरकर, मधूरा मडावी,ओम कुबडे,प्रेम कोवे यांची सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित भाषणे झाली. सोबतच विद्यार्थीनींनी गीत गायन केले. या नंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुंदा काळे यांनी मार्गदर्शन केले.मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की , शिक्षणाचे जिने उघडले दार तीच आजच्या समाजाची शिल्पकार असे उदगार काढून आटोपते घेतले. कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला वेळीच यवतमाळ जिल्हा उपशिक्षणाधिकारी शेंडगे साहेब, आणि दुसरे उपशिक्षणाधिकारी मस्के साहेब यांची उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला आनंदी आनंद दिसूनआला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वीनी उरकुडे या विद्यार्थ्यांनीनी केले.तर आभार आदित्य पावले या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर,श्रावनसिंग वडते,रंजय चौधरी,राजेश भोयर, मोहन आत्राम,विशाल मस्के, वैशाली सातारकर,शुभम मेश्राम,रूचिता रोहणकर,व शिक्षकेतर कर्मचारी पवन गिरी, बाबूलाल येसंबरे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग 10 वी अ चे वर्गशिक्षक दिगांबर बातुलवार यांनी अथक परिश्रम घेतले.