खड्ड्यांवरून राडा ,गडचांदुर रोड वर खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

खड्ड्यामध्ये पाणी साचून खड्डे अदृश्य ,अपघात वाढले

राजुरा – राजूराच्या गडचांदूर रोड वर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून हे खड्डे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालक बेजार झाले आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जा-ये करावी लागत आहे. खाड्याच्या नेमका नेम चुकला तर या खड्यात दररोज दुचाकीस्वार पडत असून त्यांचे लचके तुटत आहे. गडचांदूर मार्गावरील इंदिरा शाळेजवळील खड्यांची काही महिन्यापूर्वी थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुन्हा पाऊस आला की चेहर्‍याचा मेकअप उतरावा तश परिस्थिती पुन्हा या महामार्गाची झाली आहे. खड्डयांत आदळत आपटत वाट काढत खड्डयांतून लोकांचा प्रवास सुरुच आहे. या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा किमान खड्डे तरी नीट व्यवस्थित बुझवा अशी मागणी या मार्गावरील व्यापारी, नागरिकांनी केली आहे.