ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या
(आजाद समाज पार्टीची मागणी )


ढाणकी प्रतिनिधी..
प्रवीण जोशी


मागील 25 वर्षापासून ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी ढाणकी सह परिसरातील नागरिक करीत आहेत येथील नागरिकांना आरोग्य विषयक सोय सुविधा मिळण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या अशी मागणी दिनांक 29 ऑगस्ट रोजी आजाद समाज पार्टीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, जिल्हा शल्य चिकित्सक यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली,
ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत आठ उपकेंद्र जोडण्यात आले असून आरोग्य केंद्रात दररोज 400 बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात येते, परिसरातील 40 खेड्यापाड्यातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात, परंतु आरोग्य विषयक सुविधा मिळत नसल्यामुळे रुग्णांना रेफर करण्यात येते, ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य केंद्रात सुविधा मिळत नही ग्रामीण भाग व बंदी भागातील रुग्ण 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून उपचारासाठी आरोग्य केंद्रात येतात येतात परंतु उपचार सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यात धाव घ्यावी लागते त्यामुळे गरीब जनतेला मोठा आर्थिक त्रास सहन करावा लागतो याबाबत सतत निवेदन देऊनही ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयात दर्जा देण्यात आला नसल्यामुळे पुढील पंधरा दिवसात ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणे बाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात यावा अन्यथा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, उमरखेड तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, तालुका महासचिव, सचिन वाहुळे, उमरखेड शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, युवा तालुका अध्यक्ष विष्णुकांत वाडेकर, विनोद बर्डे सर, गौतम कांबळे,, अशीत भवरे सुशांत धोंगडे, ढाणकी शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, समाधान राऊत, आबा गायकवाड सुमित बुरसे, हाजीस खा पठाण शरद खाडे, प्रवीण तोटेवाड,शे अश्फाक यांनी केली आहे