जीवन विकास महिला प्रभाग संघाचे (AGM) राळेगाव प्रभागाची सन 2023-2024 या आथिॅक वार्षिक सर्व सर्वसाधारण सभा उत्साहाने साजरे

                                                                                                                 

सहसंपादक: रामभाऊ भोयर

दि. 24/2/2024 रोजीआर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) कोल्हे सभागृह राळेगाव येथे जीवन विकास महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष श्रीमती विभा ताई अमोल पुडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला प्रभागसंघाची सचीव श्रीमती वंदनाताई ठाकरे व कोषाध्यक्ष श्रीमती मंगला येंबडवार उपस्थित होत्या.सभेचे सूत्र संचालन ICRP शततारका पुनवटकर यांनी तर प्रास्ताविक राळेगाव प्रभागाच्या प्रभाग समन्वयक कार्तिकी मनोहरराव चांदोरे यांनी केले. सभेमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक उलाढाली बाबतचे ऑडिट वाचन प्रभाग लेखापाल सौ.योगिता ठाकरे यांनी केले.सभेला तालुका अभियान व्यवस्थापक श्री.मीलींद चोपडे, तालुका व्यवस्थापक -सामाजिक समावेशन व क्षमता बांधणी चे श्री.राजेंद्र खुरपुडे ,वरध प्रभागाचे प्रभाग समन्वयक श्री.दिनेश कोवे,वरध प्रभागाचे प्रभाग समन्वयक -सेंद्रीय शेती चे श्री.अरविंद चांदेकर, वडकी प्रभागाचे प्रभाग समन्वयक श्री.अविनाश तराडे, वडकी प्रभागाचे प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती च्या श्रुतिका गोवारदिपे,तिनही प्रभाग संघाचे अध्यक्ष,सचीव व कोषाध्यक्ष उपस्थित होते.राळेगाव प्रभागाचे प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री.काशीनाथ भगत,वडकी प्रभागाचे कृषी व्यवस्थापक श्री.मंगेश पुडके, राळेगाव प्रभागाचे प्रभाग पशु व्यवस्थापक श्री.प्रफुल्ल पटेलपैक,पशु व्यवस्थापक श्री.कुमरे, प्रभाग पशु व्यवस्थापक श्री.लढे , प्रभाग मत्स्य व्यवस्थापक श्री गजानन आत्राम व राळेगाव प्रभागसंघाची प्रभाग व्यवस्थापक श्रीमती अश्विनी चंद्रशेखर चौधरी,सावली प्रभाग संघ वरध च्या प्रभाग व्यवस्थापक श्रीमती वैशाली ताई पटेलपैक व भरारी प्रभाग संघ वडकी च्या प्रभाग व्यवस्थापक श्रीमती मनीषा ताई आदे उपस्थित होते.तसेच सर्व ग्रामसंघांचे पदाधिकारी, सर्व कॅडर व समुहातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेला प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव मतदार संघाचे आमदार डॉ.श्री.अशोकभाऊ उईके सर, माननीय आमदार महोदय यांनी महिलांना विविध योजनांची माहिती दिली आणि मार्गदर्शन केले . पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भाऊ तायडे ,जी.प.सदस्य श्री.चित्तरंजनजी कोल्हे,जी.प.सदस्य श्रीमती भोयर ताई, डॉ.कुणालजी भोयर, नगरसेवक श्री.भोंगारे व ईतर मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान काही कॅडरनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रभागसंघाच्या अध्यक्ष श्रीमती विभा ताई अमोल पुडके यांनी पण प्रभाग संघ कसा काम करत आहेत,त्याची असलेली आर्थिक उलाढाल व भविष्यातील नियोजन स्पष्ट केले. प्रास्ताविक मध्ये प्रभाग समन्वयक कार्तिकी चांदोरे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट केली.तालुका अभियान व्यवस्थापक श्री मीलींद चोपडे यांनी मागील दहा वर्षात राळेगाव तालुक्यात उमेद कसं काम करीत आहेत हे स्पष्ट केले. अनेक योजना पण सांगितल्या.अशा योजनांचा महिलांनी लाभ घेतला तर महिला सक्षमीकरण चांगल्याप्रकारे होऊ शकते हे स्पष्ट केले.सभेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.एकल नृत्य, सामुहिक नृत्य, गीत गायन, रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, लिंबू चमचा इत्यादी स्पर्धा घेण्यात आले असून स्पर्धकांना स्मृती चिन्ह (ट्राॅफि) आमदार डॉ श्री.अशोक उईके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच आमदार सरांच्या तर्फे विधवा,एकल, परित्यक्ता कॅडरला साडी वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे आभार प्रदर्शन प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री काशिनाथ भगत यांनी केले.अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सभेला सर्वांचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सहकार्य मिळाले व ही सभा चांगल्याप्रकारे पार पडली.