

महागाव प्रतिनिधी :- संजय जाधव
उमरखेड तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या ईसापुर टाकळी
परिसरात पशुधनावर सुरू असलेले बिबट्याचे हल्ले थांबता थांबत नसल्याने पशुपालकांमध्ये भीती पसरली आहे. टाकळी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ईसापूर (ता. गावात बिबट्याने एका वासरासह पारडूचा फडशा पाडला. गुरांवर हल्ले करणारा बिबट्या अद्यापही मोकाटच असल्याने वन विभागाने त्याला पकडण्यासाठी ईसापूर ठिकाणी पिंजरेलावून त्या बिबट्याला जेरबंद करावा अशी नागरिकाची मागणी होत आहे
टाकळी व ईसापूर परिसरातील घटनेला 48 तास होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने आपला पशुसंहार सुरू केला आहे. सुमारे महिन्यापासून बिबट्याने पशुपालकांना अक्षरशः रडकुंडीला आणले आहे.
फूलसावगी येथील नरेंद्र शिंदे या शेतकऱ्याच्या एका वर्षाच्या लॅबरा जातीचा श्वानाचा बिबट्याने फडशा पाडला.
आज सकाळी नरेंद्र शिंदे नेहमीप्रमाणे दूध काढण्याकरिता शेताकडे गेले असता, त्यांना श्वानाचा मानेचा भाग तसेच पोटाच्या भाग खाल्लेला दिसला. हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे त्यांनी सांगितले लवकरात लवकर या बिबट्याचा जेरबंद करून नागरिकांची भीती दूर करावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे
