इंदिरा महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन –
डिस्काउंटचा लोभ टाळा
प्राचार्य आगरकर

सहसंपादक: रामभाऊ भोयर

वस्तु वा सेवा विकत घेताना बिल अवश्य घ्यावे, बिल घेतले तरच कायदेशीररित्या ग्राहक समजल्या जातात. व्यवहार करताना डिस्काउंटचा मोह टाळा असा संदेश इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष आगरकर यांनी महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिनानिमित्त झालेल्या सभेत विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष व ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य डॉ.के एस वर्मा होते. ग्राहक संरक्षण कायदा स्थापन होण्यापूर्वीची व त्यानंतरच्या परिस्थितीची माहिती डा. के. एस. वर्मा यांनी देऊन ग्राहक अद्यापही या कायद्याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले. ऑनलाइन खरेदीतील धोक्याबाबतची माहिती सचिव प्रा. मोहन देशमुख यांनी दिली. ग्राहक तक्रार निवारणाच्या विविध पद्धती विषयी माहिती देऊन ग्राहक जागरूक व चोखंदळ असावा असे कोषाध्यक्ष
भूपेंद्र कारीया यांनी सांगितले. प्राध्यापक स्वप्निल गोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सागर दवडा, प्रा.भाग्यश्री लोहाकर आदी हजर होते. सभेचे संचालन तबसुम शेख हिने केले.
ग्राहक पंचायतीच्या तिन्ही पदाधिकाऱ्यांचा यावेळी महाविद्यालया कडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.