वणी तरोडा जिल्हा परिषद शाळा सापांबद्दल विद्यार्थ्यांना जनजागृती

शासकीय जिल्हा परिषद शाळा तरोडा वणी येथे चार विषारी नाग, मण्यार , घोणस, फुरसे ,व इतर सापाबद्दल अंधश्रद्धा व गैरसमज या बद्दल ची सविस्तर माहिती विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देण्यात आली व विद्यार्थि ना शालेय साहत्याचे वाटप MH 29 चे सर्पमित्रां कडून करण्यात आले.

तरोड़ा येथील जिल्हा परिषद शाळा ही गावालागत एकांतात असल्याने साप व सरपटनाऱ्या प्राण्यांची भिती जास्त असते. त्यापासुन बचाव करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरली. एम. एच. २९ हेल्पींग हँडस वाईल्ड एडवंचर अँड नेचर क्लब वणी तालुकाध्यक्ष अनिकेत कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत कुमरे , राजू भोगेकर , रमेश भादीकर, रवि नन्नावरे , नितिन मानुसमारे , संतोष गुम्मुलवार, देवेंद्र भोगेकार, संदीप धोटे, यांनी सोप्या भाषेत चार विषारी नाग, मण्यार , घोणस, फुरसे ,व इतर निम्य विषारी, बिन विषारी सापांची माहिती दिली. साप आपला मित्र आहे, त्याला न मारता सर्पमित्रांना बोलवा व नागपंचमीच्या दिवशी किंवा कधी पण सापला दुध पाजू नये, असे आवाहन MH 29 हेल्पिंग हँडस चे सर्पमित्र अनिकेत कुमरे यांनी केले . यावेळी उपस्थित गावातील सरपंच सौ. वैष्णवीताई सतीश वराटे, व सर्व सदस्य मुख्याध्यापक नरेंद्र डूमुरे, व सर्व शिक्षक वर्ग व शाळा सुधार समिती अध्यक्ष, नामदेव सातपुते व सर्व सदस्य, इतर गावकरी उपस्थित होते.