
ढाणकी प्रतिनिधी
प्रवीण जोशी
ढाणकी येथे एपीएल योजनेअंतर्गत कुटुंब आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना दि.२१- ऑक्टोबर रोजी त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून “आनंदाचा शिधा” वाटप करण्यात आला.
यंदाची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारने १०० रुपयात शिधा वस्तूचे पॅकेज जाहीर केले.यात रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर एक किलो आणि पामतेल एक लिटर या खाद्य वस्तूचा समावेश आहे. १९-ऑक्टोबर रोजी स्वस्त धान्य दुकानदारांना शिधा वितरित करण्यात आला होता.
त्याचL अनुषंगाने ढाणकी येथे “आनंदाचा शिधा” योजनेअंतर्गत गावातील लाभधारकांना प्रत्येकी १०० रुपये प्रमाणे आनंदाचा शिधा वस्तूंचे वाटप करून गरीबाची दिवाळी गोड करण्यासाठी सर्वच स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासनाच्या नियमानुसार आपले काम पूर्ण केले.यावेळी आनंदाचा शिधा किट स्वीकारतांना लाभधारक उपस्थित होते.
