
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरात सर्वसामान्यांनी आपली पाल्य खासगी शिकवणीत मोठ्या विश्वासाने पाठवले असताना नराधम शिक्षकाने विश्वासघात करून अत्याचार केला व ती गर्भवती राहिली या दरम्यान नराधम शिक्षक असलेल्या संदेश गुंडेकर वय २७ याने गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. यातच पीडित विद्यार्थिनीचा दुर्दैवाने मृत्यू झाला त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. त्यातील आरोपी असलेल्या शिक्षक संदेश गुंडेकर यांचे गेल्या काही दिवसापासून विद्यार्थिनी सोबत अनैतिक संबंध असल्याचे समजते. गर्भपात करण्याच्या गोळ्या दिल्या व गोळ्याच्या अतिसेवनामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. आणि तिचा दुर्दैवी अंत २२ सप्टेंबर रोजी झाला असताना २३ सप्टेंबरला ढाणकी येथे शोकसभा व निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्वच पक्षातील नेते समाजसेवक पत्रकार बांधवांनी या घटनेचा मोठ्या प्रमाणात कडाडून निषेध केला व प्रामुख्याने एक मागणी एकमुखाने लावून धरली जलद गती न्यायालयात हा खटला चालवून नराधम शिक्षकाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या घोषणेने जुने बसस्थानक परिसरातील भाग दणाणून गेला होता. सकाळपासूनच कोणत्याही प्रकारचे प्रतिष्ठान उघडले नव्हते सर्वसामान्यांनी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केल्याच यावेळी दिसून आलं.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात सपोउप सागर अन्नमवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
काही दिवसापूर्वी एका खासगी इंग्लिश शाळेने सुद्धा परप्रांतीय शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आणले होते त्यावेळेस सुद्धा त्या शिक्षकाने असंच काही केल्याची चर्चा होती. पण साहेबांनी हे प्रकरण बाहेर जाईल व गव गवा होऊन शाळेची बदनामी होईल यामुळे हे प्रकरण तिथेच निपटवले व परप्रांतातून आणलेल्या शिक्षकाल निरोप देऊन घरी पाठवल्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज दिसते.
