नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करा, नंदुरबार भाजप जिल्हा अध्यक्ष श्री विजयभाऊ चौधरी यांची मागणी

पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया गेली. दुबार पेरणी करून सुद्धा पावसाने दडी मारल्याने ती सुद्धा वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी नंदुरबार जिल्हा दुष्काळ जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ उपाय योजना कराव्यात या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी शासनाला जिल्हाधिकारी सौ.मनिषा खत्री यांच्या माध्यमातुन दिले.