
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
भारतीय बोध्द महासभा समता सेनिक दल, कळंब,पंचशील भीम मंडळ व रमाई महिला मंडळयांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.७/२/२०२३ ला माता रमाई यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कळंब येथे सकाळी मोठ्या जल्लोषात मिरवणूक
काढण्यात आली. समारोपीय कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान तथागत नगर कळंब येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण बुरबुरे तालुका शाखा कळंब, प्रमुख उपस्थिती भगवान इंगळे अध्यक्ष, यवतमाळ (पुर्व ), हाडके गुरुजी ,नरेंद्र भगत उपध्यक्ष यवतमाळ (पुर्व ),संजय कांबळे अध्यक्ष
घाटंजी ,सुरेश फुलकर सर, शेंडे साहेब,वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव करुणा मून, सरला चचाणे,भारती सावदे,अर्चना लोखंडे,
मंजुषाताई जारोंडे,केंद्रीय शिक्षिका प्रमिलाताई भगत,अमित पिसे होते. प्रास्ताविक केंद्रीय शिक्षिका उज्वलाताई भवरे यांनी केले.
केंद्रीय शिक्षिका संगीताताई कुंभारे, विशाखाताई नन्नावरे, मायाताई लढे,उमाताई इंगोले,मालाताई बरडे, यांनी तालुक्यातील लूंबिनी बुध्द विहार आस्टी, बुध्द विहार मलकापूर ,श्रावस्ती बुध्द विहार सावरगाव, तथागत बुध्द विहार कळंब व हरणे ले आऊट कळंब येथे दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन केले.
प्रांजली मून, आकांक्षा धुळे, ज्योतीताई वागदे,
वनिताताई कांबळे, लताताई भगत,
शशिकलाताई धवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महपरीनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रगौरव स्पर्धा परीक्षाचे पुरस्कार वितरण करण्यात आले. सर्वोत्तम अभिप्राय कु. पायल गजभिये… प्रथम पुरस्कार व सन्मान चिन्ह जानरावजी वानखडे तर्फे तनुजा जीवन कांबळे, मावळणी यांना द्वितीय पुरस्कार व सन्मान चिन्ह उज्वला भवरे तर्फे सचिन बोन्दडे, मेंढला यांना व तृतीय पुरस्कार व सन्मान चिन्ह नारायण बुरबुरे तर्फे कु. सोनिया बुरबुरे थाळेगाव यांना देण्यात आले. उपस्थित सर्व परीक्षार्थीना बुद्धपूजा संस्कार पाठ, धम्मयान कॅलेंडर व रमाई ग्रंथ देऊन…. मंजुषाताई जारोंडे, प्रमिलाताई भगत, राजेंद्र बलवीर, शेंडे साहेब यांनी सन्मानित केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बोध्द महासभा समता सेनिक दल, तथागत नगर, हरणे ले आऊट, आस्टी, सावरगाव, मलकापूर येथील सर्वांनी परिश्रम घेतले.कार्यमाचे संचलन सुगत नारायने व आभार निशा थोरात नी केले..
