
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव शाळेचा दहावी चा निकाल 90 टक्के लागला व दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट परंपरा कायम ठेवली.1981 ला स्थापन झालेली ही संस्था विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नेहमी गाडगे महाराज यांच्या विचारांचा अंगिकार करुन गोरगरीब विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात कुठेही कमी पडु देत नाही, यावर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार घरी जाऊन करण्यात आला, त्याच बरोबर त्यांच्या पालकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला, पुष्प गुच्छ व पेढा भरविला..
सानिया भारत सोनारखन 84.80, आस्था भगवान बातुलवार84.60, नंदिनी कालिदास ठाकरे 82.40 व राणी संजय तिवाडे 81.80 या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या, सर्व सामान्य कुटुंबातील या विद्यार्थिनीचे सर्व स्तरातील लोकांनी कौतुक केले आहे.
80 टक्के च्या वर इंग्रजी विषयात मार्क घेतल्यामुळे श्री धम्मानंद तागडे सर यांचे कडुन विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये रोख पुरस्कार देण्यात येत आहे.
मा.राजेश शर्मा, मुख्याध्यापक व धम्मानंद तागडे, सहायक शिक्षक यांच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात कौतुक करण्यात आले. या यशाचे श्रेय विद्यार्थी आपले आईवडील, अध्यक्ष रविभाऊ एंबडवार, मुख्याध्यापक व शिक्षक वृदांना देत आहे..
