
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन स्पर्धेत उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण जिल्हा परिषद शाळा सुकळी ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करीत 11 लाखाचे मिळविले आहे . मा. पालकमंत्री तथा मृदा व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र मा. संजय राठोड मुख्यकार्यकारी अधिकारी मंदार पत्की, डायट प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे,शिक्षणाधिकारी माध्य.मा. जयश्री राऊत शिक्षणाधिकारी प्राथ.प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी मा.नीता गावंडे, मा.राजू मडावी यांच्या हस्ते गटविकास अधिकारी मा. भूपेंद्र बाहेकर, गटशिक्षणाधिकारी मा.अमोल वरसे, शाळा व्य समिती उपाध्यक्ष शशिकांत जाधव, पोलीस पाटील दीपक दरणे, डॉ. आदित्य अढाऊकर मुख्याध्यापक अमोल पालेकर, सुलभक संदीप कोल्हे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सुकळी शाळा ही जिल्ह्यातील मॉडेल स्कूल असून शाळेत यवतमाळ सारख्या नामांकित शाळा असलेल्या ठिकाणावरून ग्रामीण भागातील सुकळी शाळेत मुले दाखल आहेत. शाळेत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात जाचा उपयोग संपूर्ण जिल्ह्याला होतो. शाळेत बचत बँक, परसबाग, विद्यार्थी ग्राहक भांडर, इंनोव्हेशन टाइम्स, ज्ञानरंजन मासिक, फिरते मुक्त वाचनालय,तंबाखू मुक्त शाळा उपक्रम राबविले जातात.शाळेतील मुले जर्मन, जपानीस भाषा शिकतात.
राज्य स्तरावर बेस्ट परफॉर्मन्स, मिपा, निपा पोर्टल ला यशोगाथा प्रसिद्ध आहेत. तसेच सह्याद्री वाहिनी विविध प्रसार माध्यमातून शाळेच्या उपक्रमाची दखल घेतली आहे.शाळेने यश शाळा व्य समिती अध्यक्ष संदीप दरणे, आनंद मांढरे, गजानन वसू, शांताराम ठोंबरे,अर्चना थुल, किरण शेंदरे, अतुल जाधव संपूर्ण पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून मिळविल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
