शिवसेना राळेगाव तर्फे किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

भाजप माजी खासदार वाचाळवीर किरीट सोमय्या ह्यांनी 2013 साली आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला होता.ह्या रकमेतून ह्या युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी हा निधी किरीट सोमय्या ह्यांनी राजभवन येथे जमा करणे आवश्यक होते.पण माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांना मिळालेल्या उत्तरातून त्यांनी ही रक्कम जमा केलेली नाही. शंभर कोटीच्या वर रक्कम सोमय्या ने हडपले .हा नुसताच घोटाळा नसून देशद्रोह आहे.ह्या विरोधात राळेगाव शिवसेनेतर्फे दिनांक 07 एप्रिल 2022 रोजी शिवसेना संपर्क स्थळ रावेरी पॉईन्ट येथे किरीट सोमय्या याच्या प्रतिमेला जोडे चपला मारण्यात आले सोमय्या विरोधात निदर्शन करण्यात आली व घोषणांनी परीसर दनानुन सोडला या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विनोद काकडे , राकेश राउळकर शहरप्रमुख , शंकर गायधने. संतोष कोकुल वार नगरसेवक तथा बांधकाम सभापती न. प . राळेगाव. दिपक येवले . चांदखा कुरेशी . मनोज राउत . प्रशान्त वान्हेकर उपतालुका प्रमुख . निशिकांत पोंगडे . नंदु पोंगडे . परमेश्वर जुमनाके . नामदेव डायरे . तसेच शिवसेना . युवासेना . महिला आघाडी भा. वि . से. पदाधिकारी तथा तालुक्यातील व शहरातील असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .