
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील देवधरी येथील मंगला वाघाडे यांच्या मालकीचा गोरा शेतात बांधुन असताना 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात वन्य प्राण्याकडून गोऱ्हाची शिकार करण्यात आली जेव्हा सकाळी देवधरी येथील नागरिक शेतात गेल्यावर त्यांना गोऱ्हा मृत्यूअवस्थेत दिसला तेव्हा त्यांनी श्री एम यु टोगे वनपरिक्षेत्र सहायक वडकी व कु आरती बारस्कर बीट झेत्र विहीरगाव यांना माहिती तेव्हा दोन ही कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृत्यू अवस्थेत असलेल्या गोऱ्हाची पाहणी केली असता गोऱ्हा च्या मानेला असलेल्या मोठ्या जखमीतून रक्तत्राव होऊन गोऱ्हा मरण पावला मागच्या बाजूला मोठ्या जखमा आढळल्या आहे सदर मृत्यू गोऱ्हा चा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले व गोऱ्हाला कोणत्या वन्य प्राण्याने मारले यांचा तपास एम.यु टोगे वनपरिक्षेत्र सहायक वडकी व कु आरती बारस्कर बीट श्रेत्र विहरगाव करित आहे व यावेळी , बंडु भारसकरे पत्रकार, जयपाल पेदोंर प्रमोद आंग्रे सुभाष भारसकरे विजय आत्राम उपस्थित होते
