गेल्यावर्षी पेक्षाही यंदा नापिकी उत्पन्न केवळ तीस टक्के होणार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले कपाशीचे केवळ 50 टक्के तर सोयाबीनचेही उत्पन्न तीतकेच होते पण यावर्षी तर कपाशीचे तीस टक्के व सोयाबीनचेही तितकेच उत्पन्न अपेक्षित आहे गेल्यावर्षी पेक्षाही यावर्षी मोठ्या प्रमाणावर नापिकीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे।।।।गेल्यावर्षी अतिवृष्टी ,बोन्डसड ,बुरशी ,गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले उत्पन्नात लक्षणीय घट येत उत्पन्न केवळ 50 टक्केच उत्पन्न झाले पण भावबाजीने शेतकऱ्यांना तारले गेल्यावर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पाहिजे तेवढी बसली नाही तर सोयाबीनचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले व भावही गेल्यावर्षी मिळाला नव्हता त्यामुळे गेल्यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली।।यावर्षी सुरवातीला कपाशीचे पीक चांगले आले होते पण अतिवृष्टीने पिकाचे बरेच नुकसान झाले परतीच्या पावसाने तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे नुकसान झाले कपाशी खराब झाली कपाशी ही लाल पडत आहे अजूनपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांची सितादही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस आला नाही अतिवृष्टीमुळे यावर्षी कापसाचा हंगाम लांबला त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार कारण सुरवातीच्या बॉण्डचा कापूस वजनदार असतो पण अतिवृष्टीमुळे सुरवातीची बॉण्डच पकडली नाही तसेच बीटी कपाशीचा हंगाम हा अतिशय छोटा असतो दोन वेचणीत कपाशीची उलागवाडी होते सध्यस्तीतीत कपाशीची अवस्था ही चांगली नाही तसेच पुढेही ती चांगली होईल अशी सध्यातरी परिस्थिती नाही त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात लक्षणीय घट येणार एवढे निश्चित सोयाबीनचेही हीच स्थिती आहे सुरवातीला सोयाबीनची मोड झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा सोयाबीन लावले त्यामुळेच सोयाबीनही महिनाभर लांबले बहुतांश शेतकऱ्याचे सोयाबीनअजून निघाले नाही अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेतात मोठ्या प्रमाणात कचरा झाला तसेच परतीच्या पावसात अनेक शेतकऱ्यांचे सोंगलेले सोयाबीन सापडले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन मातीमोल झाले ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन सोंगायचे आहे ते अतिवृष्टीमुळे किंवा कचऱ्यामुळे चांगले नाही त्यामुळे सोयाबीनचेही उत्पादन लक्षणीय घटणार एवढे निश्चित अतिवृष्टीमुळे तूर पिकाची परिस्थितीहो चांगली नाही जास्त पावसाने सुरवातीला मोठ्या प्रमाणात तूर मेली राहिलेली तूर ही वाढलीच नाही त्यामुळेच तुरीचे उत्पादनही घटणार एवढे निश्चित एकंदरीत अतिवृष्टीने तसेच परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले गेल्यावर्षी पेकशाही हे नुकसान अधिक असल्याने सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादन नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.