कळंब येथे शौर्य दिन उत्साहात साजरा

तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

कळंब शहरात भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा 205 वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कळंब शहरातुन टु व्हीलर रॅली भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार जिल्हा शाखेचे सचिव तथा बौद्धाचार्य जयकुमार भवरेव सुगत नारायने यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅली मध्ये समता सैनिक दलाचे कार्यकर्ते हजर होते. सदर रॅली चा समारोप तथागत नगर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आला. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे,शुभम पिसे, लक्ष्मण ढाले ,ओमप्रकाश भवरे, वंचित बहूजन आघाडीचे **_तालुका अध्यक्ष *सुगत नारायने* , रवी वानखेडे, बहादूरे सर , रोमांत पाटील,पियुष जवादे, इत्यादी हजर होते, जयकुमार भवरे व सुगत नारायने यांनी अतिशय सुंदर भाषेत शौर्य दिनाचे महत्व पटवून दिले, व शौर्यदिनाचे आयोजन समाजात मोठ्या स्तरावर व्हायला पाहिजे असे सूचक वक्तव्य केले.