समग्र शिक्षा, समावेशीत शिक्षण गट संसाधन केंद्र राळेगाव अंतर्गत जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

दिनांक ०८ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त जि प प्रा शाळा रामतीर्थ येथे डॉ. हेलन केलर व लूईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पुजनकरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला समावेशीत शिक्षण तज्ज्ञ कु.माधुरी धामंदे, सचिन वेरुळकर,विशेष शिक्षक श्री. राहुल पोटरकर, श्री. दिपेश शेंडे, श्री. विनोद मेंढे, श्री. चंद्रकांत मडावी, विषय साधनव्यक्ति श्री. प्रवीण देवकते, श्री. प्रशांत चांदोरे,कु.सुरेखा अड्डे, जि प शाळेच्या मुख्याध्यापिका कु.सोनाली उमक व स शि श्री.प्रवीण गायकवाड , दिव्यांग विद्यार्थ्यांचे व सामान्य विद्यार्थ्यांचे पालक तसेच शाळेतील विदयार्थी यांच्या उपस्थितीत जागतिक दिव्यांग सप्ताह अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी व सामान्य विद्यार्थी यांची रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनोद मेंढे,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रशांत चांदोरे, तर
श्री दिपेश शेंडे ,श्री. राहुल पोटरकर श्री विनोद मेंढे श्री. चंद्रकांत मडावी, यांनी दिव्यांगांच्या २१ प्रवर्गाविषयी तसेच त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याबाबत व पालकांना,शिक्षकांना येणाऱ्या समस्येनुरुप व कौशल्यानुसार मार्गदर्शन केले तसेच विषय साधनव्यक्ति श्री. प्रवीण देवकते यांनी उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षक यांना निपुण भारत अंतर्गत मार्गदर्शन केले तसेचविषय साधनव्यक्ति कु.सुरेखा अड्डे यांनी माता पालक यांची भूमिका, कार्य याबाबत मार्गदर्शन केले व दिव्यांग विद्यार्थ्यांना चित्रकला वही स्केचपेन,खाऊ पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा व चित्रकला स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थ्यांपैकी विजयी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यात आला.व दिव्यांग व सामान्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. माधुरी धामंदे यांनी केले आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.तसेच उपस्थित पालकांनी समाधान व्यक्त केले.