यृगात्मा शरद जोशी यांच्या स्मुतिदिनानीमीत्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शेतकरी संघटना आयोजित युगात्मा शरद जोशी यांचा स्मृतिदिन दिनांक 12 डिसेंबरला बोध बोडण(अर्जुना)येथे आयोजित करण्यात आला असून. या आयोजित मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते हजर राहणारा असून त्या त्यानिमित्त कपाशी मधील नवीन तंत्रज्ञानाची व प्रत्यक्ष प्लॉट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ह्या मेळाव्याचे आयोजन जिल्हा शेतकरी संघटना करणार असून. भारतातील शेती जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार असून जागतिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे माहिती मिळण्याच्या दृष्टीने व जमीन, पाणी, हवामान अभ्यास सत्राचे आयोजित करण्यात आली आहे. शिवार फेरीचे आयोजन केले आहेत. देशातील आणि राज्यातील सरकारांना या मार्गदर्शनाच्या दृष्टीने उपयोग होणार असून भारतीय शेतकरी स्पर्धात्मक युगात कसा तयारी करेल याची नियोजन करण्यात येणार असून. हा मेळावा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन ठरेल असे वक्तव्य जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र झोटिंग यांनी मत व्यक्त केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध वक्ते मिलिंद दामले, विजय निवल, मनीष भाऊ जाधव, सिकंदर भाई शहा, हे उपस्थित राहणार असून. या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. असे आव्हान शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले मेळाव्याचे आयोजन दि 12 डिसेंबरला दु 12 वाजता बोध बोडण अर्जुना ता यवतमाळ येथे तारासिंग राठोड यांच्या शेतात होत आहे, तरी यवतमाळ जिल्हातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तानी ऊपस्थित राहावे असे आव्हान यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सोनाली मरगडे युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन यांनी केले आहे.