पंचायत समिती समोरील खड्डा ठरतो जीवघेणा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या मुख्य दारावर असलेला खड्डा हा जीवघेणा ठरल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसापासून पंचायत समितीला दोन गेट असून एक गेट हे ग्रामीण रुग्णालय याच्यासमोर निघते तसेच दुसरे ग्रेट हे मेन रोड यवतमाळ याच्यावरती निघत असल्याने तिथून रहदारीचा मोठा रस्ता होता परंतु तिथेजो में गेट वर खड्डा पडलेला आहे तो खड्डा कोणत्याही वाहन चालकास दिसून येत नसल्याने त्या ठिकाणी मोठा अनर्थ होताना दिसून येत आहे आजपर्यंत त्या खड्ड्यात किमान 8 ते 9 गाड्या जाऊन मोठे नुकसान झाल्याचे चिन्ह सध्या दिसून येत आहे जर प्रशासकीय व्यवस्थेच्या समोर यांची उपायोजना काही दिवसापासून होत नसल्याने तर जनसामान्याचे प्रश्न प्रशासन कसे सोडतील याकडे सर्वांचे गांभीर्याने लक्ष लागल्याचे चिन्ह सध्या राळेगाव मधील जनतेस पडला जात आहे. आज रोजी खड्डयात गेलेली गाडी काढताना गाडी चालक व तेथील हजर जनता यांच्या प्रयत्नाने गाडीचे चाक उचलून बाहेर काढण्यात आले या कडे प्रशासन उदासीन दिसून येत आहे, अपघात होणार हे माहीत असताना सुधा त्या ठिकाणी कोणतीही सूचना बोर्ड लावला नसल्याने प्रशासन कार्यालय समोरील खड्डा जीवघेणा असून या कडे गांभीर्याने लक्ष देण्याचे कार्य करावे असा सूर जनतेतून होताना दिसून येत आहे