अँड्रॉइड मोबाईल व पुरेसा रिचार्ज मोबदला देई पर्यंत ऑनलाईन कामावर आशा व गटप्रवर्तकांचा बहिष्कार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटना तालुका शाखा राळेगाव च्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी यांना आशां व गटप्रवर्तकांचे निवेदन त्यात आरोग्य विभागाच्या वतीने नुकतेच प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, इ-केवायसी व आभा कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढण्याचे काम आशा स्वंयसेविकांना दिलेले आहे.
तसेच सदरचे काम एन.एच.एम. विभागाच्या वतीने नेमुन दिलेल्या कामांमध्ये येत नाही. तसेच हे सर्व कामे ऑनलाईन करावे लागणार आहे. परंतू राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दोन वर्षापूर्वी आशांना अँड्रॉइड मोबाईल देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतू अद्यापही आशा व गटप्रवर्तक महिलांना अँड्रॉइड मोबाईल मिळालेला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना असो ई- केवायसी असो, किंवा आभा कार्ड काढण्याचे काम असो तसेच आभा कार्ड काढण्याकरीता लाभार्थीना डॉक्टरांच्याबरोबर ऑनलाईन संपर्क करून देणे याशिवाय अनेक कामे आशा व गटप्रवर्तक महिलांना सक्तीने करावयास लावले जात आहे. आजही आशा व गटप्रवर्तक जमेल तसे ऑनलाईन पध्दतीने काम करीत आहेत.प्ररंतु आयटक संघटनेने जोपर्यंत अॅन्डराईड मोबाईल व दर महा रू.४००/- रिचार्ज देत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आशा व गटप्रवर्तक महिलांना परिवारातील सदस्याच्या मोबाईल फोन द्वारे सदर कामे करावी लागत आहेत व मोबाईल चे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीच्या मदतीने ऑनलाइन कामे करावी लागत आहेत व त्यामुळे मोबाईल रिचार्जचा भुर्दंड आशा स्वंयसेविकांनाच सोसावा लागत आहे हे अन्याय कारक आहे, सद्या ऑनलाईन काम करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महिलांना दरमहा फक्त रू.१०० /- रिचार्ज खर्च दिला जातो. आता कुठल्याच कंपन्या रू.१००/- मध्ये एक ‌महीण्याचे रिचार्ज करून देत नाही. ही गोष्ट प्रशासनाला माहीत असुन सुद्धा त्यात सर्व ऑनलाइन कामे करा म्हणतात, जर आरोग्य विभागाचे लक्षात महिनाभर ऑनरॉईड मोबाईल सुरु राहीन्यासाठी रू.१००/- बॅलन्स मध्ये रिचार्ज करून देणारी कंपनी असेल त्या कंपनीचे नाव आपल्या आरोग्य विभागाने सांगावे असा प्रश्न संघटनेने निवेदनातून विचारला आहे व तसा रिर्चाज करुण द्यावा असेही म्हटले आहे.
आशा स्वंयसेविकांना ऑनलाइन कामांकरिता मदत घेतलेल्या व्यक्तीचे मानधन व मोबाईल करिता दरमहा ४०० रु. चा रिचार्ज करिताचा आर्थिक भुर्दंड आशा स्वंयसेविकांनाच सोसावा लागणार आहे.
तेव्हा सर्वप्रथम अँड्रॉइड मोबाईल व रिचार्ज भत्ता दरमहा ४०० रु व त्या कामाचे उचित मानधन दिल्याशिवाय ऑनलाईन कोणतेही काम आशा व गटप्रवर्तक महिलांना सांगण्यात येवू नये असे म्हटले आहे. असे करणे म्हणजे भारतीय घटनेचा अवमान असून महिलांचा अपमान आहे. या महिलांच्याकडून सक्तीने फुकट काम करवून घेणे त्यांना रिचार्जसाठी पैसे न देता काम करवून घेणे हे कृत्य भारतीय राज्य घटनेच्या विरुध्द आहे.
आपल्या आरोग्य विभागाने वरील प्रकारची कामे करवून घेतल्यास आमच्या संघटने समोर आंदोलनाशिवाय काहीही पर्याय राहणार नाही असे म्हटले आहे. शासन स्तरावर या बाबतीत जो पर्यंत योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत आमचा बहिष्कार राहील यावेळी राळेगाव तालुक्यातील चारही आरोग्य केन्दांच्या आशा व गटप्रवर्तक यांनी निवेदन दिले यावेळी असंख्य महिला उपस्थित होत्या.