
हिमायतनगर प्रतिनिधी: (परमेश्वर सुर्यवंशी)
हिमायतनगर तालुक्यातील गोर सेनेची आक्रमक भूमिका दिसुन येऊ लागली स्वराज्य संस्था मधील आरक्षण रद्द केल्याने ओ बि सी समाजावर टांकती तलवार असल्यासारखे झाले आहे आज न्यायालयाने दिलेला निर्णय हे घातक असल्याचे सांगितले जात आहे त्याच बरोबर ओं बि सी समाजाची जातीनिहाय जनगणना करुन पुन्हा एकदा त्यांना राजकीय आरक्षणा मध्ये समाविष्ट करावे व नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्यात यावेत असे विविध मागण्या गोर सेना यांनी तहसीलदार हिमायतनगर यांच्या कडे केल्या आहे
ओबीसींच्या महाराष्ट्रातल्या राजकीय आरक्षणाबाबत मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देतांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या या वर्गाच्या सगळंच आरक्षण रद्द केल्यावर राज्य सरकारनं त्यावर पुनर्विचार याचिकाही दाखल केली होती. पण तीही निकालात काढली गेली. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
ओबीसी समाजाच्या निराशेचा आणि संतापाचा सूर रस्त्यांवर दिसतो आहे. सगळ्यात पक्षांमधल्या ओबीसी नेत्यांनीआंदोलनाचा सूर लावला आहे.
न्यायालयाचा निकाल आल्यावर राज्य सरकारमधल्या मंत्र्यांतर्फे सांगण्यात आलं होतं की आरक्षणाचा पेच सोडवला जाईल आणि तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. पण निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याच्या आदेशाकडे बोट दाखवत निवडणूक जाहीर केली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडता आहे महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी सरकारने ओं बि सी समाजाचा विश्वास घात केला आहे त्यामुळे आज ओं बि सी आरक्षणासाठी राज्य सरकार समोर विनंती करावी लागत राजकीय क्षेत्रातील आरक्षण रद्द केल्याने लोकशाहीचा आंत होईल घटना दुरुस्ती करावी लागेल म्हणून न्यायालयाने दिलेला निर्णय लवकरात लवकर खारीज करुन ओ बि सी आरक्षण बाधित राहण्यासाठी हिमायतनगर गोर सेनेने तहसीलदार यांना निवेदन दिले त्यावे उपस्थित गोर सेना तालुका अध्यक्ष प्रमोद राठोड व आदि कार्यकर्ते उपस्थित होते
