दिग्दर्शक अनिकेत परसावार यांची नाटक व चित्रपट कार्यशाळा संपन्न

बामणी येथील मॉन्टफोर्ट हायर सेकंडरी स्कूल मध्ये २ दिवसीय नाटक व चित्रपट कार्यशाळा झाली संपन्न. या कार्यक्रमाचे आयोजक ब्रदर प्रेम कुमार (उपमुख्याध्यापक) व ब्रदर एम. ए. अँथोनी (मुख्याध्यापक) होते. तर ही कार्यशाळा कवी, लेखक, दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी घेतली. या मध्ये दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी चित्रपट व नाटक लिखाण, कॅरेक्टर आणि ऑब्झर्वेशन, ऑडिशन कसे द्यायचे, अभिनय कसा करायचा व अभिनयाचे ९ रस ही सर्व माहिती कार्यशाळेत त्यांनी दिली. या कार्यशाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिग्दर्शक अनिकेत परसावार सध्या त्यांच्या आगमनी चित्रपट डफ वर काम करीत आहे. चित्रपटाची कथा विदर्भीय लोकांच्या जीवनावर आधारित आहे असे आमच्या न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिग्दर्शक अनिकेत परसावर यांनी सांगितल आहे.