
दोन दिवसापासुन संततधार सुरु असलेल्या पावसाने परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान मुसळधार आलेल्या पावसाने नाल्यांना पुर आले. सावेत्री पिंपरी येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेली पाण्याची विहीर ही नाल्याच्या तिरावरती म्हणण्यापेक्षा नाल्यातच खोदून विहिरीचे बांधकाम करण्यात आल्याने त्या नालेल्या आलेल्या पुराचे पाणी त्या विहिरीला अडून ते पाणी सावेत्री येथील नाल्याकाठच्या घरामध्ये शिरले त्यामुळे नाल्या काठावरील घरातील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद शाळेत आश्रय घ्यावा लागला.
दिनांक 18 जुलै मंगळवार रोजी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने नाल्याला पूर आला. सावित्री गावालगत जोड नाला असल्याने आणि जलजीवन मिशनची विहीर ही नाल्या तीरावर म्हणण्यापेक्षा नाल्याच्या तीरालगत विहिरीचे बांधकाम झाल्याने नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याचा प्रवाह हा त्या विहिरीला अडून त्या पाण्याच्या प्रवाहाने नाल्याकाठील घराच्या दिशेने मार्ग काढून नाल्याजवळील घरामध्ये पुराचे पाणी शिरोले त्यामुळे सावित्री गावातील नागरिकांमध्ये एकच तारांबळ उडाली. त्यामुळे नाल्या काठावरील घरातील नागरिकांनी आपला व आपल्या परिवाराचा जिव वाचविण्याकरीता व सुरक्षेच्या दृष्टीने जि.प.शाळेत आश्रय घ्यावा लागला.
तेव्हा पावसामुळे नाल्याला येणाऱ्या पुराचा प्रवाह विहिरीला अडून जो प्रवाह गावाकडे येतो तो प्रवाह व्यवस्थित नाल्याच्या दिशेने काढून द्यावा व गावातील नागरिकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नाल्याच्या काठावर प्रशासनाने सुरक्षा भिंत बांधून देण्याची मागणी सावेत्री येथील नागरीकांनी केली आहे.
