नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या शर्वरी कावलकर या विद्यार्थिनी चा सत्कार

राळेगाव तालुका प्रतिनिधी: रामभाऊ भोयर


राळेगाव येथील शर्वरी अनिलराव कावलकर या विधार्थिनीने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर तीने आपले नाव कोरून कुटुंबाचे व राळेगाव तालुक्याचे नाव मोठे केले. या बाबत राळेगाव शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यां नागरिकांनी घरी जाऊन शर्वरी चा सत्कार केला.
720 गुणांपैकी 667 गुण या विध्यार्थीनीला प्राप्त झाले. विशेष म्हणजे बारावीच्या परीक्षेत देखील तीला 94% मार्क्स मिळाले होते. पुढील वैधकीय शिक्षण घेऊन गोर -गरीब जनतेची सेवा करण्याचा मानस तीने वेक्त केला
शर्वरी च्या सत्कार प्रसंगी, अरविंदराव तामगाडगे, मंगेश राऊत (नगरसेवक), राजु रोहणकर, संजय दुरबुडे, बाळासाहेब दरणे, दिलीप कन्नाके, गोपाल मशरु, महेंद्र फुलमाळी, विनोद ठाकरे, निलेश मिटकर, किशोर वाघ, विजयसिंह पुरोहित, आदि सह नागरिक उपस्थित होते.