गांजा लागवडीची शेतकऱ्यांना शासनाने परवानगी द्या: शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या उध्वस्त झाला आहे सतातची नापिकी, कर्जबाजारीपणा ,ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ नैसर्गिक आपत्ती आणि विविध पिकांना उत्पादन खर्चावर आधारीत पिकांना भाव न मिळने यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे अशावेळी शेतकऱ्यांवर वाढलेला कर्जाचे डोंगर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा जिल्ह्यात मोठ्या झाल्या प्रमाणात झाल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक विवंचनेतून मानसिक तलावाखाली येऊन आत्महत्या होतात शेती हा व्यवसाय तोट्याचा होत असून आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत अशा वेळेस शेतकऱ्यांना गांजा लागवडीची शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच मदत व पुनर्वसन मंत्री आणि कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेही या आशियाचे पत्रच लिहून तशी गांजा लागवडीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे