

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यात मागील जुलै ऑगष्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील पिके खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यामुळे शासनाने अतिवृष्टीची मदत घोषित केली होती ती मदत एक महिन्यांपूर्वी पासून तहसीलदार यांच्या खात्यात पडून होती मात्र ही मदत कर्मचाऱ्यांच्या हेवेदाव्यामुळे शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यास अतिविलंब झाला असून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची रक्कम जमा करण्यात यावी अन्यथा दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालय समोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन राळेगांव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने दिं १९ ऑक्टोबर २०२२ रोज बुधवारला उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
ऐन दिवाळीचा सण केवळ दोन चार दिवसावर असतांना अद्यापही अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली दिसत नाही .त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही तेव्हा या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याचे संबंधितांना आदेश देऊन सामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रक्कम खात्यात जमा न झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा दिवाळी अगोदरच सर्व अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सदर रक्कम त्वरित जमा करावी अन्यथा नाईलाजाने राळेगाव तालुका सरपंच संघटनेला ऐन दिवाळीच्या दिवशी तहसील कार्यालया समोर उपोषणास बसण्याची वेळ येऊ नये अशा आशयाचे निवेदन राळेगाव तालुका सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आले असून यावेळी सरपंच अंकुश मुनेश्वर, राजेंद्र तेलंगे, सुधीर जवादे, किशोर धामंदे, प्रवीण नरडवार, आशिष पारधी, प्रवीण येंबडवार, नारायण इंगोले, किशोर हिवरकर, प्रभाकर दांडेकर, विशाल येनोरकर, मधुकर चाफले, अजय पिंपरे, सुमेध भेले, विजय कोल्हे, प्रसाद ठाकरे,नितीन खडसे, किसना आत्राम, हर्षल आडे, सी एस मेश्राम, उमेश गौरकार, आदी सरपंच उपस्थित होते.
