
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
दिनांक तीस मार्च पंचवीस रोजी ढाणकी शहरात वर्ष प्रतिपदा हा उत्सव ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर येथे पार पडला यावेळेस या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उमरखेड येथील खंड सहकार्यवाह रणजीतजी चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. याच कार्यक्रमाला अनुसरून ते यावेळी आलेल्या गणमान्य स्वयंसेवकांना संबोधन करताना म्हणाले.
आपण जेव्हा स्वयंसेवक हा शब्द वापरतो तेव्हा रूढार्थाने प्रचलित असलेले आशयाहून वेगळा अर्थ अभिप्रेत असतो. स्वयंसेवक या शब्दाचा अभिप्रेत असलेला असे टेबल खुर्च्या मांडणारा किंवा किंवा सतरंज्या अंथरणारा आवरणारा असा नाही. राष्ट्राची स्वतःहून सेवा करण्यासाठी स्वतःला अधिकाधिक योग्य बनविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारा ही स्वयंसेवक या शब्दाची संकल्पना आहे. त्याच्या या प्रयत्नासाठी लागणारे सर्व वैचारिक अधिष्ठान त्याचे त्याने प्राप्त करून घ्यावे हीच संघाची अपेक्षा असते.
त्यासाठी लागणारे सर्व संस्कार त्याच्यावर व्हावेत असा संघाचा प्रयत्न असतो. व स्वयंसेवक हा कधीच अर्थ प्राप्तीसाठी स्वतःवर झालेल्या संस्कार विसरत नाही व विकल्या जात नाही. प्रसंगी तडजोड करत नाही हे विशेष उत्तम संस्कार स्वयंसेवकावर व्हावेत असा नेहमीच संघाचा प्रयत्न राहिलेला आहे. शिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून संघाचा स्वयंसेवक हा संस्कारांनी भारला जावा त्याचे चारित्र्य निरपवाद असावे आचरण आदर्श असावे यावर भर असतो.
समाजाला मी काय देऊ शकतो देशाचे नुकसान होणार नाही याची चिंता वाहून तदनुसार आचरण कसे करता येईल याच विचारांनी व्यक्ती; व्यक्तीचा दृष्टिकोन घडवावा. ही स्वयंसेवक या शब्दाची कल्पना रुजलेली असते. या कार्यक्रमाला आनंद येरावार, रुपेश कोडगिरवार, महारुद्र बिबेकर, अभिजीत चंद्रे, साहेबराव लकडे, उमेश कुंभारे, सचिन कारंजकर, प्रणय गोरेलू, विनायक राहुलवाढ, हिमत धवने, नचिकेत जोशी, सुनील येरावार, गजानन चापके, पिंटू तोडकर, रुपेश काळकर, हरीश मामीलवाड, विनायक अक्कावार, शुभम तोटेवाड, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार माननारे अनेक स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
