2000 च्या नोटा पाहण्यास मिळणार का?


प्रतिनिधी::प्रवीण जोशी


उमरखेड तालुक्यातील अदृश्य 2000 ची नोट RBI च्या दि. 19 मे 2023 च्या नविन आदेशानुसार रु. 2000/- च्या नोटा या चलनातून बंद करण्यात येणार आहेत. सदर आदेशाचा अर्थ रु. 2000/- च्या नोटा बंद झाल्या असा गृहीत धरू नये, रु. 2000/- च्या नोटा या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत चलनात चालणार असून तेव्हापर्यंत आपण आपल्याकडील असलेल्या रु. 2000/- च्या नोटा आपल्या बँक खात्यात जमा करू शकतात, त्याचप्रमाणे सदर नोटा या इतर चलनी नोटांमध्ये बदलून देण्याची सुविधा सुद्धा देण्यात आली असून दि. 23 मे 2023 पासून एकावेळी फक्त रु. 20,000/- पर्यंत नोटा आपण बदलून घेऊ शकतात,सदर चलन बदलाची सुविधा ही सर्व बँका तसेच RBI च्या ठराविक कार्यालयांमध्ये देण्यात येणार आहे. त्या संदर्भात लवकरच नियमावली प्रसिद्ध करण्यात येईल. साघ्या आज रोजी 2000 नोटाचीच चर्चा सुरू आहे

नोटबंदी नंतर चलनात आलेल्या रु. 2000/- च्या नोटा या 2018 पासून छापण्यास बंद करण्यात आल्या असून सद्यस्थितीत जवळपास 50% नोटा या चलनातून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. सर्व खातेदार तसेच नागरिकांनी घाबरण्याचे किंवा लागलीच बँकेत गर्दी करण्याची गरज नाही.