
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
राळेगाव पं. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कबड्डी, खोखो, क्रिकेट, व्हॉलीबॉल या स्पर्धा तसेच पालकांसाठी संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धा घेण्यात आली. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे मुख्य अध्यापक श्री टी. झेड. माथनकर यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच उमेशभाऊ गौळकर तथा पोलिस पाटील ढगेश्र्वर मंदाडे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर झालेल्या संस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन श्री वी. एन. लोडे यांनी केले. सलग तीन तास चाललेल्या कार्यक्रमात पालकांचा सहभाग लक्षणीय होता. त्यानंतर सनेहभोजन पार पडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी. पी. आसुटकार, आर. एस. वाघमारे, सी. मोडक, बी. बी. कामडी, वी. टी. दूमोरे,एस. एम. बावणे, एस. वाय. भोयर तथा विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
