
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील क्रांती चौकातील जुनी नगरपंचायत कार्यालय परिसर गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षीत असून या परिसरात मोठाली झाडे वृक्ष पालापाचोळा असल्याने येथे पशुपक्षी वास्तव्यास असतात पक्षाची घाण व पिसे इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडल्याने व सततच्या पावसाने तेथे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याचा परिणाम येथील व्यापारी वर्गाच्या आरोग्यावर होत आहे. याबाबत योग्य बंदोबस्त करुन येथील परिसर स्वच्छ असावा याकरीता व्यापारी वर्गाने विनंत अर्ज तसेच प्रभाग क्र. १२ व प्रभाग क्र.५ येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा आशयाचे निवेदन नगरपंचायत कार्यालयास दिलं आहे. या परिसराची नियमित स्वच्छता व निगरानी व्हावी परिसर स्वच्छ ठेवून येथील व्यापारी वर्गावर होणाऱ्या परिणामाची
काळजी घ्यावी याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. परिसरात पक्षी सरपटणारे विषारी प्राणी यांचा मुक्त संचार असतो तसेच उन्हाळ्याच्या दिवसात येथे आग लागण्याचे ही दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेता या परिसराची योग्य काळजी घ्यावी अशा मागणीचे निवेदन व्यापारी वर्गाच्या वतीने जयेश पोपट यांच्या नेतृत्वात नगरपंचायत राळेगाव प्रशासनास दिले आहे. यावेळी रमेश सोनी, बंडू निखाडे, डॉ. पुरुषोत्तम उगेमुगे, गजानन ठूणे यांची उपस्थिती होती.