
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल येथील शैक्षणिक सत्र 2024/25 मध्ये NMMS
या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील NMMS व सारथी शिष्यवृत्ती पात्र विध्यार्थी मध्ये प्रतीक दारव्हेकर, धनवंती धुमाने देव्यानी राऊत
पूर्वा घोटेकार, आयुष कोहड
श्रावणी भोरे,श्रेया झाडे
अक्षरा उमाटे हे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. NMMS हि शिष्यवृत्ती केंद्र सरकार पुरस्कृत असून
यामध्ये पात्र होणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रति वर्षी 12000 /- रुपये लाभ मिळतो ही शिष्यवृत्ती चार वर्षे म्हणजे 12 वी पर्यंत मिळते
तर या परिक्षे मध्ये शाळेतील 16 विद्यार्थी पास झाले आहे तर यामध्ये 8 विध्यार्थी गुणांनुक्रमे पात्र झाले आहे . राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती मध्ये कुणबी,मराठा प्रवर्गातून 3 विद्धार्थी पात्र झाले .. त्यांना प्रति वर्ष चार वर्षे 9600 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते…
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देने व आर्थिक दृष्ट्या गरीब विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून प्रतिभावंत विध्यार्थी चा शोध घेऊन मुख्य प्रवाहात आणणे हा या शिष्यवृत्ती मागचा उद्देश आहे… तरी पात्र झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव डॉ. अर्चना धर्मे,. मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे,NMMS परीक्षा प्रमुख आनंद घुगे, प्रवीण कारेकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे….
