खैरी येथील शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांनी जिंकली गावकऱ्यांची मन : सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

खैरी हे गाव सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असे होते परंतु मागील काही वर्षात ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची अखंडता खंड पडली होती. शालेय जीवनात मुलांच्या मूलभूत कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या अंगातील सुप्त कला गुण जगासमोर यावे या उद्देशाने खैरी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे पर्वावर आयोजित करण्यात येत होते परंतु ही परंपरा मागील दहा ते पंधरा वर्षांपासून खंडित झाली होती. या परंपरेला चालना देण्यासाठी खैरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने 7 फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत आठवडी बाजाराच्या प्रांगणात सर्व शालेय सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
मुलाच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात कॉन्व्हेंट पासून एक ते दहावी बारावी पर्यंतच्या सर्व सरकारी व निमसरकारी शाळेच्या विद्यार्थ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात खैरी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, यशवंत विद्यालय व लोक विद्यालय यासह कॉन्व्हेंटच्या इवल्याच्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला मागील तीन दिवसापासून हे कार्यक्रम सुरू होते यात पालक वर्गासह गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य करून शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला व सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात कॉन्व्हेंट ते पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आपल्या अंगी असलेले कलागुण सादर केले व त्यात प्रेक्षकांची वाह वाह मिळविली. मागील पंधरा वर्षाच्या कालावधीत बंद पडलेले संस्कृती कार्यक्रम यावर्षी ग्रामपंचायत च्या वतीने आठवडी बाजार परिसरातील रंगमंचावर पार पडलेल्याने विशेषता शालेय विद्यार्थ्यांच्या पालकात व गावकऱ्या आनंदमय वातावरण होते व असेच मागील परंपरेनुसार दरवर्षी प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे अशी पालक वर्गात चर्चा होती. मात्र गावात पार पडलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाने शालेय विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचे भरपूर मनोरंजन केले.
ग्रामपंचायत प्रशासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल खैरी ग्रामवासी व शालेय विद्यार्थी पालकाकडून ग्रामपंचायत प्रशासनावर कौतुकाचा वर्ष होत आहे.